Saturday, May 18, 2013

सल ….


एक सल,

मैलाच्या दगडाला देव मानल्याची!

प्रवासात दिसणारा,

कोस-दरकोसावर साथ देणारा ---

मनातील भार टाकला त्याच्यावर .

पण …

मैलाचाच दगड तो !

प्रवासात फक्त अंतर दाखवणारा!

देवाचे देवपण त्याला काय ठाऊक ?

तरीही,

ठेवला विश्वास त्याच्यावर .

त्यावेळी आले लक्षात ….

मुक्कामाची जागा ठरवायची असते आपण ,

त्यासाठी घ्यावी फक्त त्याची मदत.

'हे' उमगते,

म्हणूनच वाटते …

आहे एक सल,

मैलाच्या दगडाला देव मानल्याची ……

असं कसं होतं !

Thursday, May 16, 2013

अबोल,
तरीही …
संवाद मनाशी .
स्तब्ध सारे ,
तरीही …
जिवंत आसमंत .

Saturday, May 11, 2013

Thursday, May 9, 2013

जगण्याचा अर्थ शोधत
अमर्याद जीवनाच्या,मर्यादा ओळखत
आयुष्य जगायचे असते .......
स्वच्छंद विहारणारा विहंग,
निरागस ,निष्पाप बालक ---
... ... असेच स्वच्छंदी ,निरागस ,निष्पाप
आयुष्य जगायचे असते ......
निस्वार्थ सेवा ,त्याग करून
दुसऱ्यांवर प्रेम करत
आयुष्य जगायचे असते .......
अपेक्षा भंगाचे शल्य सोसून
दुसऱ्याला मदत करत
आयुष्य जगायचे असते .....
व्यवहारी जगाशी तडजोड करून
प्रेमाने नातेसंबंध जुळवत
आयुष्य जगायचे असते ....
आरंभ माहित असलेल्या
पण अज्ञात असलेल्या अंतापर्यंत
आयुष्याची वाटचाल करत
आयुष्य जगायचे असते ....
सुखदु:खाला,यश -अपयशाला
सोमोरे जात ,कुठलीही खंत न करता
आयुष्य जगायचे असते..........
-अनिता जाधव
माणूस एकटाच असतो .
'माझे' असे काही नसते.
भास त्याला 'माझे' असण्यचा .
त्याचे दु;ख त्यालाच सोसायचे .
सुखही ज्याचे त्यालाच उपभोगायचे .
... ... प्रत्येकाचे स्वतंत्र जगणे असते.
जो तो स्वतःचे जगणे जगत असतो .
भास त्याला जग त्याचे असण्याचा
पण--------------------
माणूस एकटाच असतो,
त्याचे असे काही नसते.........
---डॉ.अनिता जाधव

Tuesday, May 7, 2013

मैत्री
बंध हे गुंफलेले
अकल्पित सारे!
नाते ना कोणाचे कोणाशी
तरीही------
सर्वस्वी एकमेकांचे
गूढ वलय भोवती
आकर्षतात दोघेही
न ठरवताच काहीही
घडे सारे काही
बंध हे कसले ?
न बांधलेले ....
तरीही,
दोघे बंधनात बांधलेले .
बंध हे गुंफलेले
अकल्पित सारे!

Monday, May 6, 2013

asun nasane....