Thursday, May 9, 2013

जगण्याचा अर्थ शोधत
अमर्याद जीवनाच्या,मर्यादा ओळखत
आयुष्य जगायचे असते .......
स्वच्छंद विहारणारा विहंग,
निरागस ,निष्पाप बालक ---
... ... असेच स्वच्छंदी ,निरागस ,निष्पाप
आयुष्य जगायचे असते ......
निस्वार्थ सेवा ,त्याग करून
दुसऱ्यांवर प्रेम करत
आयुष्य जगायचे असते .......
अपेक्षा भंगाचे शल्य सोसून
दुसऱ्याला मदत करत
आयुष्य जगायचे असते .....
व्यवहारी जगाशी तडजोड करून
प्रेमाने नातेसंबंध जुळवत
आयुष्य जगायचे असते ....
आरंभ माहित असलेल्या
पण अज्ञात असलेल्या अंतापर्यंत
आयुष्याची वाटचाल करत
आयुष्य जगायचे असते ....
सुखदु:खाला,यश -अपयशाला
सोमोरे जात ,कुठलीही खंत न करता
आयुष्य जगायचे असते..........
-अनिता जाधव

No comments:

Post a Comment