Saturday, May 18, 2013

सल ….


एक सल,

मैलाच्या दगडाला देव मानल्याची!

प्रवासात दिसणारा,

कोस-दरकोसावर साथ देणारा ---

मनातील भार टाकला त्याच्यावर .

पण …

मैलाचाच दगड तो !

प्रवासात फक्त अंतर दाखवणारा!

देवाचे देवपण त्याला काय ठाऊक ?

तरीही,

ठेवला विश्वास त्याच्यावर .

त्यावेळी आले लक्षात ….

मुक्कामाची जागा ठरवायची असते आपण ,

त्यासाठी घ्यावी फक्त त्याची मदत.

'हे' उमगते,

म्हणूनच वाटते …

आहे एक सल,

मैलाच्या दगडाला देव मानल्याची ……

No comments:

Post a Comment