बरीच वर्षे झाली घर सोडून
पण,आठवणी मात्र राहिल्या मनात घर करून
बालपणातील आठवणींनी आणि
घराच्या तीव्र ओढीने
घराची वाट धरली...
... गल्लीतून जाताना,
आसपासच्या घराकडे नजर गेली.
प्रत्येक घर बदललेले दिसले
दोन-चार ओळखीचे चेहरे सोडून,
बाकी सारे अनोळखी दिसले
घराजवळ जावून पावले थबकली.
खिडक्या नि भिंतीचा साचा तोच
.....पण घराचे रूप बदललेले दिसले
विकत घेणाऱ्याने बदल केलेल्या रुपात,
आठवणीतील घराच्या पुसटशा खुणा मात्र दिसत होत्या
बदललेल्या घराच्या दारातून,
आत जाण्याची इच्छादेखील झाली नाही.
ते घर अनोळखी भासले....
'हे आपले पुर्वीचे घर नव्हे',
याची प्रकर्षाने जाणीव झाली ..
.'आठवणीतील घर'मनात ठेवून,. ...
पावले परत फिरली .............
पण,आठवणी मात्र राहिल्या मनात घर करून
बालपणातील आठवणींनी आणि
घराच्या तीव्र ओढीने
घराची वाट धरली...
... गल्लीतून जाताना,
आसपासच्या घराकडे नजर गेली.
प्रत्येक घर बदललेले दिसले
दोन-चार ओळखीचे चेहरे सोडून,
बाकी सारे अनोळखी दिसले
घराजवळ जावून पावले थबकली.
खिडक्या नि भिंतीचा साचा तोच
.....पण घराचे रूप बदललेले दिसले
विकत घेणाऱ्याने बदल केलेल्या रुपात,
आठवणीतील घराच्या पुसटशा खुणा मात्र दिसत होत्या
बदललेल्या घराच्या दारातून,
आत जाण्याची इच्छादेखील झाली नाही.
ते घर अनोळखी भासले....
'हे आपले पुर्वीचे घर नव्हे',
याची प्रकर्षाने जाणीव झाली ..
.'आठवणीतील घर'मनात ठेवून,. ...
पावले परत फिरली .............
No comments:
Post a Comment