झाडांवर बसून किलबिलणाऱ्या पक्षांची मैत्री पाहून वाटते----
झाड आपल्या या मित्राला बिनधास्त स्वतःच्या कवेत घेतो.
पानांच्या हातांनी पक्षाच्या पाठीवरून हात फिरवताना पाहून ,
त्यांच्या मैत्रीचा हेवा वाटतो.
पक्षी झाडाशी चांगलीच दंगामस्ती करतात.
... या फांदीवरून त्या फांदीवर बागडतात.झाड आणि पक्षी कोणता खेळ खेळत असतील?
लपंडाव कि पाठशिवणी?पक्षी एका फांदीवर बसला तर दुसरी फांदी त्याला शोधत असेल !
या खेळाचा कंटाळा आला कि, मग पाठशिवणीचा खेळ खेळत असतील !
फांदीवर राज्य असेल तर, पक्षाच्या उडून जाण्यामुळे फांदीला तो सापडतच नसेल !
पक्षावर राज्य असेल तर,पक्षी मात्र फांदीला ताबडतोब शिवत असेल.
असा त्यांचा खेळ खूप वेळ चालत असेल.
केव्हा केव्हा मनोरंजन म्हणून पक्षी आपल्या आवाजात गायन करत असेल.
काही वेळा पक्षी मूकपणे फांदीवर बसलेला असतो.तो फांदीला स्वतःच्या वेदना तर सांगत नसेल!
अशा वेळी फांदी त्याच्या पाठीवरून पानांचा हात फिरवून त्याला धीर देत असेल.
काही वेळा झाडही त्याला स्वतःच्या समस्या सांगत असेल.मग पक्षी त्याला धीर देत असेल.
झाडाला पक्षामुळे खूप त्रास सहन करावा लागतो.पक्षी त्याच्या खोडावर चोंच मारून त्याला घायाळ करतो.
झाडाला वेदना होतात,तरीही मैत्रीसाठी तो सारे सहन करतो.एखादेवेळी झाडही आपल्या फांदीने पक्षाची पिसे तोडतो.
तरीही पक्षी त्याला माफ करतो.पक्षी पुन्हा त्याच झाडावर त्याच्या ठरलेल्या वेळी जावून बसतो.
झाड त्याला पाहुणचार म्हणून आपली फळे चाखायला देतो.त्यांची निस्वार्थ मैत्री आपल्याला बरेच काही सांगते.
आपल्याला जीवनात निस्वार्थ मैत्री करण्याचे शिकवते...........

chan
ReplyDeletethanks
Delete